महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे Coronavirus : कोरोनाला हद्दपार करण्याकरिता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह लोकवस्ती आणि झोपडपट्य्यांमधील रहिवाशांसाठी आता ‘शॉवर रुम’चा उपाय केला जाणार आहे. सावर्जनिक स्वच्छतागृहे आणि महापालिकेच्या रुग्णालयांत ही सोय उपलब्ध होईल. याठिकाणी कपडे धुण्यापासून वैयक्तिक स्वच्छता अगदी अंघोळीचीही व्यवस्था राहील. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणाऱ्यांसोबत डॉक्टर, पारिचारिक, वॉर्ड बॉय आणि “बायो वेस्ट’ गोळा करणाऱ्या कामगारांना “शॉवर रुम’चा वापर करता येणार आहे.
कोरोनाविरोधातील अशा नव्या उपायांसाठी महापालिका आणि दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंस्ट्रीज (डिकाई) यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटल दहा ठिकाणी “शॉवर रुम’ची सोय असेल. ज्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि सफाई कामगारांनी काम संपल्यानंतर घरी जाण्याआधी वैयक्तिक स्वच्छता करता येणार आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी उपाय केले जात आहेत; तरीही पेठा आणि झोपडपट्ट्यांत संसर्ग वाढत आहे. या भागांतील स्वच्छतागृहांपासून धोका वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यांत येथील स्वच्छतागृहे चकाचक करून लोकांसाठी सॅनिटायझर, डेटॉल पुरविले जाणार आहे.