महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पिंपरी चिंचवड जवळील हिंजवडी परिसरात असलेल्या राजीव गांधी पार्क मधील काही IT कंपन्या आजपासून सुरू होणार आहेत. काही अटी आणि शर्थिंवर राज्य सरकारने कंपन्या सुरू करण्याची परवानगी दिल्याचा दावा करत या कंपन्यांनी तशी माहितीही आपल्या कर्मचाऱ्यांना मेलकरून दिली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या इमारतीमध्ये अशा प्रकारची तयारीही केली आहे.
राज्य सरकारने दिलेल्या परवानगी नुसार 33 टक्के कर्मचारी बुधवारपासून कामावर रुजू होऊ शकणार आहेत. मात्र असं असलं तरीही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात घोषित केलेल्या प्रतिबंधित परिसरातील कोणत्याही IT कर्मचाऱ्यांना कामावर जाता येणार नाही नसल्याची बाब जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
दुसरीकडे IT कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांनी मात्र राज्य सरकारच्या ह्या निर्णयाला विरोध असल्याचं FITEचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितलं आहे.