नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधानांचं कौतुक; ‘देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, कारण…’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ नोव्हेंबर । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं खुलेआम कौतुक केलं. गडकरी म्हणाले की, आर्थिक सुधारणांसाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे. गडकरी मंगळवारी TIOL पुरस्कार 2022 कार्यक्रमाला संबोधित करत होते. हा कार्यक्रम ‘TaxIndiaOnline’ पोर्टलने आयोजित केला होता.

भारतातील गरीब लोकांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज असल्याचंही केंद्रीय मंत्री म्हणाले. मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनी भारताला एक नवी दिशा दिली, ज्यामुळे उदारमतवादी अर्थव्यवस्था झाली, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

गडकरी पुढे म्हणाले की ‘लिबरल अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली, त्यासाठी मनमोहन सिंग यांचा देश ऋणी आहे.’ माजी पंतप्रधान सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे 1990 च्या दशकात मी महाराष्ट्रात मंत्री असताना रस्ता बांधण्यासाठी निधी उभारता आला होता, अशी आठवण गडकरी यांनी सांगितली. गडकरी म्हणाले की, उदार आर्थिक धोरण शेतकरी आणि गरीब लोकांसाठी आहे.

उदारमतवादी आर्थिक धोरण कोणत्याही देशाच्या विकासात कशी मदत करू शकते, याचे चीन हे उत्तम उदाहरण आहे, असेही गडकरी म्हणाले. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी भारताला अधिक भांडवली खर्च गुंतवणुकीची गरज असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले- एनएचएआय महामार्गाच्या बांधकामासाठीही सर्वसामान्यांकडून निधी गोळा करत आहे.

गडकरी म्हणाले की, त्यांचे मंत्रालय 26 ग्रीन एक्स्प्रेस वे बांधत असून त्यांना पैशांची कमतरता नाही. त्यांच्या मते, एनएचएआयचा टोल महसूल सध्याच्या 40,000 कोटी रुपयांवरून 2024 च्या अखेरीस 1.40 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *