महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । तब्बल 103 दिवसानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी जल्लोषात सगळ्यांचे आभार मानले. याचबरोबर न्यायालयाने ईडीच्या कारवाईवर आक्षेप घेत ईडीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दरम्यान ईडीने या जामीना विरोधात आपला आक्रमक पावित्रा घेतला आहे. ईडी आता संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊतयांना अटक केली होती. बुधवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यानंतर संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली. परंतु ईडी याविरोधात जात मुंबई हायकोर्टात याचीका दाखल केली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या जामीनाला ईडीचा विरोध आहे.
दरम्यान यावर जामीन रद्द करण्यासाठी ईडीच्या याचिकेवर,आज होणार सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टासमोर या याचिकेवर काही वेळात होणार सुनावणी होणार आहे. यामुळे हायकोर्टात काह निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संजय राऊत यांना पुन्हा अटक होणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.