Ajit Pawar : मागील काही दिवस अजित पवार कुठे होते ? स्वतः केला खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ नोव्हेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मागील काही दिवसांपासून राज्यासह माध्यासमोर न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाष्य करत पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (NCP Ajit Pawar clarify absence 8 days public appearance maharashtra political crisis )

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते. मात्र, अजित पवार गैरहजर दिसले. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, आठ दिवसांनी माध्यमांसमोर आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. मी नाराज असल्याच्या अफवा आहेत. पाच दिवस मी आजारी होतो. त्यामुळे मी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत नाराजीच्या चर्चांना अजिप पवारांनी पुर्णविराम दिला.

तसेच, माझा खासगी दौरा होता. सहा महिन्यापूर्वी मी तिकीट काढली होती. मला खासगी आयुष्यदेखील आहे. असही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. शिर्डी येथील शिबिरात अजित पवारांची अनुपस्थिती म्हणजे दादा नाराज तर नाहीत ना, गुवाहटीच्या रस्त्यावर लक्ष ठेवून राहा रे कुछ तो गडबड है, असं ट्वीट मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलं होतं तर दुसरीकडे शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अजित पवार यांची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही असं म्हटलं होते. गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *