महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी। मुंबई – कोरोना संसर्गामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने राज्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारला काही कर आणि शुल्क यांच्यात वाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने सामान्य नागरिकांचा थेट संबंध नसलेल्या करात वाढ केली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या उत्पादन शुल्कात वाढ होण्याची शक्यता असून दारू आणि मुद्रांक शुल्क ह्यात वाढ होऊ शकत . मुद्रांक शुल्काबाबत सरकार आस्ते कदम टाकत आहे.राज्याला मालमत्ता व्यवहारातूनही मोठे उत्पन्न मिळते. जमीन, घरे खरेदी विक्रीचा नागरिकांशी थेट संबंध येतो.त्यामुळे मुद्रांक शुल्कात वाढ करण्याचा सरकारचा विचार होता. आता कोरोनाच्या संकाटात काय करायचे यावर सरकार विचार करत असल्याचे सुत्रा कडून समजते.