महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । पुणे । विशेष प्रतिनिधी। ओमप्रकाश भांगे ।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोककल्याणकारी उपक्रम देशातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने 2018 साली स्थापन करण्यात आलेल्या ‘नमो नमो मोर्चा भारत’ च्या सातारा जिल्हाध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती उदयन महाराज मित्र मंडळाचे अध्यक्ष मदन भिमाजी साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती, नमो नमो मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी सोपान उंडे -पाटील यांनी ‘ महाराष्ट्र 24’ ला दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकोपयोगी उपक्रम, योजना शहरी तसेच ग्रामीण भागातील युवक, विध्यार्थी, महिला, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून, जनजागृती करणे तसेच या संघटनेचा विस्तार व संघटना बळकटी करण्यासाठी 2018 साली या देशव्यापी संघटनेची स्थापना करण्यात आलेली आहे.
समाजाप्रती सेवाभाव, देशभक्ती व प्रखर राष्ट्रप्रेमाने प्रेरित, सामाजिक, राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती बाळगणारे महाविद्यालयीन युवक/युवती, महिला व पुरुषांनी ह्या राष्ट्रव्यापी संघटनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सोपान उंडे-पाटील यांनी केले आहे.
मदन साबळे यांच्या नियुक्तीबद्दल सातारा जिल्हावासीयांकडून तसेच उदयन महाराज मित्र मंडळाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
*राष्ट्र निर्मितीच्या दिशेने एक पाऊल ….*
नमो नमो मोर्चा (भारत) हे एक स्वतंत्र राष्ट्रीय संघटन असून भारतीय जनता पक्षाची विचारधारा असलेली संघटना आहे. नमो नमो मोर्चा देशाचे सर्वोत्तम व झपाटयाने विस्तार होत असलेले राष्ट्रीय संघटन असून सेवाभाव, सामाजिक कार्य, राष्ट्रप्रेम, देशभक्ती या प्रगल्भ विचाराने प्रेरित शहरी व ग्रामीण भागातील युवा, महिला व पुरुष वर्ग येथे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. मा. पंतप्रधानांच्या लोककल्याणकारी योजना विध्यार्थी, युवक, महिला, वृद्ध, शेतकरी व कामगार यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचे कार्य आम्ही या माध्यमातून करत आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासन व प्रशासना पर्यंत पोचण्यासाठी महत्त्वाचा दुवा म्हणून या माध्यमातून कार्य केले जात आहे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून सदस्यांना जैविक जीवनशैली व गो-आधारित नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त युवकांनी आमच्या संघटनेमध्ये सहभागी व्हावे!
*सोपान उंडे-पाटील,
*प्रभारी महाराष्ट्र प्रदेश, नमो नमो मोर्चा भारत*