महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी। मुंबई । हिंदुस्थानात कोरोना विषाणूच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. लॉकडाऊनचा कालावधी 17 मे पर्यंत वाढवण्यात आला असला तरी देशात रूग्णांची संख्या 50 हजार जवळ पोहोचली आहे. एकीकडे रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे यावर लस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. देशात 30 ठिकाणी लसींवर संशोधन सुरू आहे. याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. पंतप्रधान मोदी आणि वैज्ञानिक यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर देशात 30 वेगवेगळ्या लसींवर काम सुरू असून लवकरच चाचणी सुरू करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.
कोरोनावर लस तयार करण्यासाठी तीन स्तरांवर काम सुरू आहे. सध्या जी औषधे उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून यावर उपाय शोधला जात आहे. तसेच नवीन औषधे आणि मॉलिक्यूल तयार केले जात आहे व झाडांचा काढा आणि उत्पादनात अँटी व्हायरसच्या किती संभावना आहेत याचाही शोध घेतला जात आहे..
मोदींनी व्यक्त केला विश्वास
बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी वैज्ञानिक या कात यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच सरकार आणि वैज्ञानिक यांच्यात समन्वय असून याचा लवकरच चांगला परिणाम दिसेल. तसेच मोदींनी संकटाच्या वेळी कम्प्युटर सायन्स, केमिस्ट्री आणि बायोटेक्नोलॉजीच्या वैज्ञानिक यांनी एकत्र येऊन काम करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.