टाळेबंदी उठवण्याचे नियोजन जाहीर करावे ; राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – टाळेबंदी उठवतानाचा ‘एग्झिट प्लान’ राज्य सरकारने आधीच जाहीर करावा. आता शाळांचे प्रवेश सुरू होणार आहेत. ई-लर्निंग प्रत्येक ठिकाणी शक्य नाही. त्यामुळे शाळा कशा प्रकारे पुन्हा सुरू करणार याचीही कल्पना पालकांना द्यावी, तसेच परप्रांतीय श्रमिक बाहेर पडत आहेत. त्यामुळे कारखान्यांमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यांची माहिती राज्यातील तरुण, तरुणींना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने गुरुवारी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखिल चर्चेसाठी मंत्रालयात बोलावण्यात आले होते. या बैठकीत राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. राज्‍यातील अनेक कंटेनमेंट भागांमध्ये पोलिसांना गृहित धरूनच काम सुरू आहे. रमजानचा महिना सुरू असल्याने अनेक ठिकाणी गर्दी होताना, लोक घराबाहेर पडताना दिसतात. अनेक सण आतापर्यंत घरात राहूनच साजरे केले.

असल्याने मुस्लिम समाजानेही त्याचा विचार करावा. पोलिसांवरही गेला दीड महिना प्रचंड ताण असून ते थकले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी एसआरपीएफ म्हणजे राज्य राखीव दलाच्या तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात याव्यात, अशी मागणीही राज ठाकरे यांनी या बैठकीत केली.सुरक्षेची काळजी घ्या सरकारी कर्मचारी, पोलिस, सफाई कामगारांची काळजी घ्या. सरकारी कर्मचारी, पोलिस ते सफाई कामगार अशा अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या सर्वांच्या सुरक्षेची काळजी घ्या. स्पर्धा परीक्षांसाठी आलेल्या तरुणांना घरी जाण्यासाठी किंवा जे लोक हॉस्टेलमध्ये अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी काही व्यवस्था करता येईल ती करावी. अशी मागणी केल्याचेही राज ठाकरे यांनी नंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *