महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने अनेक शिवसैनिक तसंच नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत संजय राऊत यांनी ट्वीटही केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, “हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है..साहेब..विनम्र अभिवादन !जय महाराष्ट्र!”
हे नाते खुप जुने आहे.
ये रिश्ता बहोत पुराना है..
साहेब..
विनम्र अभिवादन !
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/vDhofuiVbi— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
याच ट्विटमध्ये संजय राऊतांनी एक पोस्टरही शेअर केलं आहे. प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी, असा उल्लेख या पोस्टरमध्ये केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच मुंबईतल्या शिवाजी पार्क इथं शिवसैनिकांची गर्दी जमली आहे.