डी. फार्मसीच्या अर्जाची मुदत वाढ; 22 पर्यंत संधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । नाशिक । पदवी व पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांप्रमाणे औषधनिर्माणशास्‍त्र शाखेच्‍या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. विद्यार्थी- पालकांना यामुळे मनस्‍तापाला सामोरे जावे लागते आहे. आता सुधारीत वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २२ नोव्‍हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. (D. Pharmacy Admission Extension of application Up to 22 )

डी.फार्मसीसाठी ९ जूनपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली होती. फार्मसी कौन्‍सिल ऑफ इंडियाच्‍या भूमिकेमुळे प्रवेश क्षमतेचा तिढा झालेला असतांना, नोंदणी प्रक्रियेला वारंवार मुदतवाढ दिली जाते आहे. वाढीव मुदत काल (ता.१५) संपत असतांना पुन्‍हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या वाढीव मुदतीतच विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.

त्‍यासाठी ई-स्‍क्रुटीनी व प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी असे दोन पर्याय उपलब्‍ध करुन दिलेले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चे पहिले सत्र संपलेले असताना आता पुन्‍हा मुदतवाढ न देता तातडीने प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी भावना पालक, विद्यार्थ्यांकडून व्‍यक्‍त केली जाते आहे. सध्याच्‍या स्‍थितीत अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यापर्यंतचे वेळापत्रक डीटीईकडून प्रसिद्ध केलेले आहे. परंतु पुन्‍हा मुदतवाढ दिल्‍यास या वेळापत्रकात नव्‍याने बदल होण्याची शक्‍यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *