शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार? या माजी खासदारानं केली भविष्यवाणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ नोव्हेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पहिल्यापासून पटत नव्हतं, आताही पटत नाही असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हंटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी रावसाहेब दानवे आणि संजय राऊत यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. रावसाहेब दानवे यांनी देखील हसत-हसत राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणून खळबळ उडवून दिली होती. त्याचाच आधार घेत संजय राऊत यांनी सरकार पडणार असा दावा करत असतांना रावसाहेब दानवे हे कधी कधी खरं बोलतात असाही दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ते कधीही कोसळू शकते असा आरोप विरोधकांनी वारंवार केला आहे. मात्र, याच दरम्यान रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा दावा करत चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार येत्या दोन महिन्यात पडेल असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्या विधानाचा दाखला देत केला आहे.
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद बंदची हाक दिली आहे, त्यामध्ये त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला आहे त्यावर देखील खैरे यांनी खडेबोल सुनावले आहे.

रावसाहेब दानवे त्यांचे सासरे आहे त्यांना रेल्वे आणायची आहे त्यासाठी त्यांनी लोटांगण घालवं असा देखील चंद्रकांत खैरे यांनी टोला लगावला आहे.
याशिवाय हर्षवर्धन जाधव हे काहीही बोलत असतात, सायको माणूस असल्याची टीका देखील चंद्रकांत खैरे यांनी केल्याने वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असा दावा ठणकावून चंद्रकांत खैरे यांनी केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *