Crime News: तरुणाचा खळबळजनक दावा ; चार तरुणींनी कारमध्ये कोंबले, जबरदस्तीने रात्रभर शरीरसंबंध ठेवले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ नोव्हेंबर । चंडीगड – पंजाबमधील जालंधर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका फॅक्टरीत काम करणाऱ्या तरुणाने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. चार तरुणींनी आपल्याला कारमध्ये कोंबले. त्यानंतर अपहरण करून रात्रभर शरीर संबंध ठेवले, असा दावा त्याने केला आहे. दरम्यान, पीडित तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही. मात्र तरीही गुप्तचर विभागाकडून या प्रकरणाची तपासणी सुरू आहे. या तरुणाने प्रसारमाध्यमांना घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे. त्यानंतर त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडिया आणि अनेक वेबसाईट्सवर शेअर होत आहे.

दरम्यान, पीडित तरुणाने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, मी कारखान्यातून घऱी जात होतो. तेव्हा मागून एक कार जवळ येऊन थांबली. त्यातून चार तरुणी प्रवास करत होत्या. त्यांनी पत्ता विचारण्यासाठी चिठ्ठी दिली. मी चिठ्ठी वाचत असताना त्यांनी माझ्या डोळ्यांत काही तरी टाकले. तसेच डोळ्यांवर पट्टी बांधली. त्यानंतर माझे हातपाय बांधून मला कारमध्ये कोंबले. त्यानंतर या तरुणींनी कार एका निर्मनुष्य ठिकाणी नेली. मला अंमली पदार्थ दिले. नंतर त्या चौघीही जणींनी माझ्याशी आळीपाळीने संबंध प्रस्थापित केले. नंतर पहाटे तीन वाजता मला लेदर कॉम्प्लेक्समध्ये परत आणून सोडले.

पीडित तरुणाने दावा केला की, या सर्व तरुणींचं वय हे २२ ते २३ वर्षांदरम्यान होतं. तसेच एकंदरीत त्या चांगल्या घरातील वाटत होत्या. त्या सर्वजणी एकमेकींशी इंग्रजीतून बोलत होत्या. दरम्यान, या प्रकरणी का दाखल केली नाही असं विचारलं असता पीडित तरुणाने त्याच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल करू नको असा सल्ला दिल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *