संजय राऊतांन दिलासा ; ईडीच्या आव्हान याचिकेबाबत मोठी अपडेट समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ नोव्हेंबर । संजय राऊत यांच्या जामिनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकराणात काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. मात्र त्यांच्या जामीनाला ईडीचा विरोध होता. इडीने संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात आव्हान याचिका दाखल केली होती. मात्र आता ईडीची ही आव्हान याचिका देखील फेटाळण्यात आली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यानंतर आता न्यायमूर्ती एम. एस कर्णिक यांनीही या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे.

सुनावणीस नकार

संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. मात्र या जामिनाला ईडीने विरोध केला होता. ईडीने संजय राऊत यांच्या जामिनाविरोधात आव्हान याचिका दाखल केली होती. प्रथम न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नॉट बीफोर मी म्हणत ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर आता न्यायमूर्ती एम. एस कर्णिक यांनीही या याचिकेवर सुनावणीस नकार दिला आहे. यामुळे संजय राऊत यांना मोठा दिसाला मिळाला आहे.

काय आहे पत्राचाळ प्रकरण?

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले.

या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *