महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – पुणे – बांबू लावूनही लोक ये जा करतात ,लॉक डाउन चा उद्देश सफल होत नाही म्हणून आज रात्री 11 नंतर पुण्यातील रेड झोन एरिया पत्रे लाऊन सील करण्यास प्रारंभ झाला . घराबाहेर पडू नका म्हणून स्पिकरवरुन सकाळ पासून आवाहन करण्यास आज काही ठिकाणी तर उदयापासुन संपूर्ण रेड झोन परिसरात प्रारंभ होणार आहे. कमी जागेतील , छोट्या छोट्या घरात जास्त व्यक्तसंख्या असलेल्या कुटुंबांची अवस्था अर्थातच त्रासदायी होणार आहे. घरात राहुनही त्यांना फिजिकली डिस्टन्स पाळता येणे मुश्किल होणार आहे . अशा अवस्थेत रेड झोनला आता आणखी खड़तर सामना करावा लागणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती पेठा पत्रे लावून सील करण्यात आल्या , कोणी आत जाऊ शकणार नाही, आणि कोणी बाहेर येवू शकणार नाही असे असले तरी सकाळी 10 ते 2 यावेळेत जीवनावश्यक म्हणजे भाजीपाला, दूध , किराणामालाची इथली आतिल दुकाने रहिवाशाना उपलब्ध असणार आहेत.