नवरील आरोपांच्या फैरी सुरूच; करोनाच्या फैलावाचा सामना करताना चीनकडून भयानक चूक झाली : डोनाल्ड ट्रम्प

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – वॉशिंग्टन- करोना विषाणूंच्या फैलावावरून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आरोपांच्या फैरी सुरूच ठेवल्या असून, करोनाच्या फैलावाचा सामना करताना चीनकडून भयानक चूक झाली आहे किंवा त्यांची क्षमताच नव्हती, अशी टीका त्यांनी केली.

करोनामुळे जगभरात आतापर्यंत दोन लाख ६४ हजार जणांचा मृत्यू झाला असून, त्यात अमेरिकेतील ७६ हजार नागरिकांचा समावेश आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, ‘करोनाचा फैलाव सुरुवातीलाच थांबवणे शक्य होते आणि ती गोष्ट सोपीही होती. मात्र, चीनला ते शक्य झाले नाही. ही भयानक चूक होती किंवा त्यांची क्षमता नव्हती. तेथे कोणीतरी मूर्ख होता आणि त्याने त्याचे काम योग्य पद्धतीने केले नाही.’

दरम्यान, रिपब्लिकन सदस्य केव्हिन मॅककार्थी यांच्या नेतृत्वाखाली चीन कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या गटामध्ये सर्व महत्त्वाच्या समित्यांचे निवडक सदस्य असतील. चीनकडून विविध न्यायक्षेत्रांमध्ये आव्हान देण्याचे इशारे मिळत आहेत, त्याला प्रतिबंध करण्यासाठी हा गट प्रयत्न करणार आहे. एक वर्षापूर्वीच या गटाची स्थापना करण्यात येणार होती.

दररोज होणार चाचणी

लष्करातील सहकारी करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आपणही दररोज करोनाची चाचणी करून घेणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. ‘माझा त्या सहकाऱ्याशी फारसा संपर्क आला नाही, असे. उपाध्यक्ष माइक पेन्स यांचाही त्याच्याशी अत्यल्प संपर्क आला. पण तरीही आम्ही दोघांनी चाचण्या करून घेतल्या आहेत, आम्हा दोघांच्या चाचण्याही निगेटिव्ह आल्या,’ असे ट्रम्प म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *