Maharashtra kesari: पुणे की, नगर? ठरलं महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे होणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार की नगरला?, महाराष्ट्र केसरी स्पर्धा शरद पवार गट घेणार की, रामदास तडस गट? या वादावर अखेर भारतीय कुस्ती महासंघाने आपली भूमिका स्पष्ट केली. संजयकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अस्थायी समिती महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेईल. भारतीय कुस्ती महासंघाचे बी एन प्रसूद यांनी पत्रकार परिषदेत हे जाहीर केलं. पुण्यातील तडस गटाकडून होणारी स्पर्धा अस्थायी समिती घेणार आहे.

स्पर्धेच आयोजन कोण करणार?

नगरच्या कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर बंदीची कारवाई होऊ शकते. पुण्यातील स्पर्धेची घोषणा आधीच झाली होती. माजी महापौर मुरलीधर मोहोळ या स्पर्धेच आयोजन करणार होते. या स्पर्धेची निवड चाचणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र केसरी ही कुस्तीमधील मोठी मानाची स्पर्धा आहे. राज्यभरातील कुस्ती शौकीनांच या स्पर्धेकडे लक्ष असतं.

शरद पवार यांचही स्पर्धेला समर्थन

या निर्णयाचं पुण्यातील स्पर्धेचे आयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ व गत महाराष्ट्र केसरी विजेत्यांनी स्वागत केले आहे. पुण्यात स्पर्धा व्हावी, अशी सर्व पेहलवानांची इच्छा होती. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुस्ती परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत रामदास तडस आणि काका पवार यांच्याकडे कुस्ती परिषदेची सूत्र देण्यात आली. एकप्रकारे शरद पवार यांनी या कुस्ती स्पर्धेला हिरवा कंदील दाखवलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *