Vikram Gokhale: ‘विक्रम गोखले म्हणजे….’ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । Vikram Gokhale Marathi Actor passed away: मराठी मनोरंजन विश्वात तब्बल चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून दुर्धर आजारानं त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानं मराठी – हिंदी चित्रपट विश्वाला मोठा हादरा बसला आहे.

गोखले यांचे जाणे हे मराठी प्रेक्षकांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी ही कधीही न भरुन येणारी आहे. मराठी, हिंदी चित्रपट विश्वातील मोठमोठया सेलिब्रेटींनी गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गोखले यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या कुटूंबियांप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.

मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले विक्रम गोखले हे मराठी, हिंदी चित्रपट क्षेत्रातील व्हर्सेटाईल अभिनेते म्हणून त्यांचे नाव आदरानं घ्यावे लागेल, ते एक सर्जनशील अभिनेते होते. त्यांनी केलेल्या भूमिका, त्यांचे विविध रोल्स हे आपल्या कायम स्मरणात राहतील याबद्दल शंका नाही. मी त्यांच्या निधनानंतर खूप अस्वस्थ झालो आहे. मला मोठा धक्का झाला बसला आहे. मी त्यांच्या कुटूंबियाप्रती सहानुभूतू व्यक्त करतो. मोदी यांच्या त्या व्टिटलाही अनेकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *