Governor controversy: मविआ लवकरच ‘महाराष्ट्र बंद’ करणार? …अखेर राज्यपालांना दिलेला अल्टीमेटम संपला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ नोव्हेंबर । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं आणि राज्यामध्ये नव्या वादाला तोंड फुटलं. आधी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यपालांना राज्यातून हटवा, त्यांना दिल्लीला परत पाठवा अशी मागणी विरोधक पक्षांनी केली होती.

राज्यपालांवर कारवाई न झाल्यास पुढील भूमिका 28 नोव्हेंबरला ठरवू असा अल्टीमेटम उदयनराजे भोसले यांनी दिला होता. कोश्यारी यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंदचा इशारा दिला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून प्रयत्न केले जात होते. सर्व पक्षांनी एकमताने बंदचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आज भूमिका ठरवणार असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

राज्यपालांना राज्यातून हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदमध्ये ठाकरे गटासह मित्र पक्षांनीही सहभागी व्हावे यासाठी आता खासदार संजय राऊत यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चाही राऊत यांनी केली होती.

राज्यपालांवर कारवाई न झाल्यास पुढील भूमिका 28 नोव्हेंबरला ठरवू असा अल्टीमेटम उदयनराजे भोसले यांनी दिला होता. तर ठाकरे गट आणि महाविकास आघाडी एकत्रित येत महाराष्ट्र बंद बाबत आज भूमिका ठरवणार आहेत. तर उदयनराजे भोसले, संभाजीराजे यासंदर्भात काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष्य लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *