Sadabhau Khot: ‘राज्यकर्ते हे रेड्याची औलाद’ ; सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ डिसेंबर । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे. अनेक राजकीय नेते वादग्रस्त विधान करत आहेत. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटत आहे. अशातच रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे. राज्यकर्ते हे रेड्याची औलाद असे वादग्रस्त वक्तव्य खोत यांनी केलं आहे. त्यामुळे, राज्यात सुरु असलेल्या वादात नव्याने भर पडली आहे. ( Sadabhau Khot controversy statement Maharashtra Politics )

पुण्यातील एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या संवाद या क्रायक्रमात सदाभाऊ बोलत होते. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त विधान केलं.

राज्यकर्त्यांना डोक्याची भीती वाटत असते कारण जिकडे जास्ती डोकी तिकडे सगळे राज्यकर्ते बोलायला लागतात. राज्यकर्ते बोलायचे असतील तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे रेड्याच्या पाठीवर हात ठेवावे लागतील. कारण राज्यकर्ते हे रेड्यांची औलाद असते. त्यांच्या पाठीवर हाथ ठेवल्याशिवाय ते बोलत नाहीत. अशा शब्दात खोत यांनी राजकीय नेत्यांवर निशाणा साधला आहे.

एखादा मंत्री बोलतो आणि त्याचा व्हिडिओ झालेला असतो. मला वाटत अधिवेशन घ्या आणि मंत्र्यांना बोलवा. संघटित होऊन प्रश्न सोडवावे लागतील. सगळ्या मजल्यावर बसलेलं अधिकारी ड्राफ्ट तयार करत असतात . मी मंत्री राहिलो आहे. आम्ही फक्त वाचतो आणि ते सगंतील तसे सही करतो. ५० टक्के मंत्र्याचे काम हा अधिकारीच करत असतो. म्हणून मला वाटतं तुम्ही सगळे संघटतीत राहा. असही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *