Datta Jayanti 2022 : दत्त जयंतीला पुजा केल्याने मिळते पितृ-दोषांपासून मुक्ती, जाणून घ्या पूजा विधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ डिसेंबर । दत्ताला विष्णुचा अवतार मानले जाते. येत्या 07 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. पौराणिक कथेनुसार दत्ताचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला झाला होता. दत्ताला त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे संयुक्त रूप मानले जाते.

पौराणिक कथेनुसार दत्ताला तीन तोंडे आणि सहा हात होते. दत्ताची तीन तोंडे वेदांच्या गाण्यांना समर्पित होती आणि सहा हात शाश्वत परंपरेच्या रक्षणासाठी समर्पित होते. दत्ताची पूजा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. आज आपण दत्त जयंतीला केली जाणारी उपासना पद्धती आणि मंत्रांबद्दल जाणून घेणार आहोत.

 

दत्त जयंतीला पुजा कशी करावी?

महर्षी अत्री आणि माता सती अनुसूया यांचे पुत्र असलेल्या दत्ताची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते. असे मानले जाते की, माता अनुसूयाच्या पवित्रतेच्या परीक्षेवर प्रसन्न होऊन त्रिदेवांनी एकत्रितपणे तिच्या पुत्रांना जन्म दिला. दत्त जयंतीच्या दिवशी शुभ्र आसनावर दत्ताचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. यानंतर धूप, दिवा, फुले, नैवेद्य अर्पण करावी. तसेच दत्ताला पांढर्‍या रंगाची फुले किंवा मिठाई अर्पण करावी. दत्त जयंतीच्या पूजेत अवधूत गीतेचा पाठ केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते. पूजेच्या शेवटी दत्त स्तोत्राचे पठण करावे.

या मंत्राचा करावा जप

बीज मंत्र : ॐ द्रां

तांत्रोक्त दत्तात्रेय मंत्र : ‘ॐ द्रांदत्तात्रेयाय नम:’

दत्त गायत्री मंत्र : ‘ॐ दिगंबराय विद्महेयोगीश्रारय्धीमही तन्नो दत: प्रचोदयात्

दत्तात्रेय का महामंत्र : ‘दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

दक्षिणामूर्ति बीजम च रामा बीकेन संयुक्तम्

द्रम इत्यक्षक्षाराम गनम बिंदूनाथाकलातमकम दत्तास्यादि मंत्रस्य दत्रेया स्यादिमाश्रवह तत्रैस्तृप्य सम्यक्त्वंबिन्दुनाद कलात्मिका येतत बीजम्मयापा रोक्तम्ब्रह्म-विष्णु- शिव नामकाम

डिस्क्लेमर : अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *