Shivendraraje Bhosale : छत्रपतींच्या घराण्याचा वारसा सांगता ना ? असं का म्हणाले शिवेंद्रराजे उदयनराजेंना

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ डिसेंबर । Shivendraraje Bhosale : प्रतापगडावरील शिवप्रताप दिन साेहळ्याचे उदयनराजेंना निमंत्रण दिलं गेले नाही असे उदयनराजेंनी (udayanraje bhosale) बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले हाेते. त्याबाबत आज माध्यम प्रतिनिधींनी आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांचे लक्ष वेधले असता त्यांना मला जिल्हाधिकारी कार्यालयातून निमंत्रण आलं होतं. परंतु आपण ज्या घराण्यात जन्मलो आहे त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते. प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीची असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय अशी खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजेंवर (udayanraje bhosale) केली.

दरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी समान नागरी कायद्याबाबत देखील त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले यामध्ये कश्मीर मधील 370 कलम, अनेक वर्षाची ही मागणी होती. समान नागरी कायदा हा राज्याच्या हिताचा निर्णय असेल असं मला सुद्धा वाटतंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.

मंगल प्रभात लोकांच्या वक्तव्यावरून आमदार शिवेंद्रराजे भाेसले म्हणाले मी स्वतः त्या कार्यक्रमाला होतो. त्यांनी जे विधान केलंय ते कोणाशी तुलना करून केलेलं नाही. आता अलीकडच्या काळात कुठलेही वक्तव्य केले की भावना भडकण्याचा प्रयत्न होतोय पण काल त्यांच्या विधानातून असं काही दिसून येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *