“शिंदे गटातील आमदारांना मिळाले आणखी पाच कोटी, गुवाहाटीत झालं वाटप” ; या नेत्याचा आरोप

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ डिसेंबर । एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकासा आघाडी सरकारही कोसळले होते. दरम्यान, या बंडखोर आमदारांना ५० खोके देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून नेहमी होत असतो. त्यातच आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे गटातील आमदारांना आणखी पाच पाच कोटी रुपये दिले गेल्याचा सनसनाटी आरोप केला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासह इतर काही मुद्द्यांवर आज चंद्रकांत खैरे यांनी आज आंदोलन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरेंनी शिंदे गटातील आमदारांवर सनसनाटी आरोप केले. चंद्रकांत खैरे म्हणाले की, इकडे या गद्दार आमदारांना ५० खोके मिळाले होते. त्यानंतर आता गुवाहाटीमध्ये गेल्यावर प्रत्येकी पाच पाच खोके आणखी मिळाले. एका उद्योगपतीने मला ही खात्रिलायक माहिती दिली आहे, असा सनसनाटी आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.
खैरे पुढे म्हणाले की, हे जर असं असेल. केवळ आमदारांना जपण्यासाठी सरकार असं करत असेल तर ते योग्य नाही. शेतकरी आज उपाशी मरतो, आत्महत्या करयला लागलाय. आम्ही शेतकऱ्यांसाठी येथे उन्हा तान्हात आंदोलन करतोय. तिकडे हे आमदारांची खुशामतखोरी करताहेत. कशाकरता करताहेत, असा सवालही खैरे यांनी विचारला आहे.

दरम्यान, शिंदे गटातील आमदारांवर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *