महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ डिसेंबर । ९० च्या दशकात बिकिनी गर्ल नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. ऋषी कपूर यांच्याबरोबर बीचवर बिकिनीमध्ये सिझलिंग लूक देत सर्वांना घायाळ करणाऱ्या सोनमने आपल्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, “मला खूप अगोदरच बॉलिवूडमध्ये परतायचं होतं पण ते काही कारणाने शक्य झालं नाही” असं सांगितलं आहे. याशिवाय तिने फारच कमी वयात बॉलिवूड सोडण्याचं कारणही स्पष्ट केलं.
‘त्रिदेव’ चित्रपटातील लोकप्रिय गाणं ‘ओए… ओए… नजर ने किया है इशारा’मध्ये झळकलेल्या सोनमने प्रेक्षकांवर आपल्या सौंदर्याची अशी काही जादू केली होती की माधुरी- संगीतासारख्या अभिनेत्रींना प्रेक्षक विसरुन गेले होते. पण अचानक एक दिवस तिने बॉलिवूडला अलविदा केलं ज्यामुळे सर्वच हैराण झाले होते. त्यावेळी सोनमचं नाव अंडरवर्ल्ड डॉन अबु सलेमशी जोडलं जात होतं. त्यामुळेच सोनम देश सोडून निघून गेल्याचं बोललं जातं.
https://www.instagram.com/lost_andfound72/?utm_source=ig_embed&ig_rid=b0b0f30c-0cbe-4a9f-a346-186efe7bbfaf