प्रवाशांना मोठा दिलासा! कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा पुन्हा सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ डिसेंबर । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगलीमधील जत तालुका आणि सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगितल्यानंतर सीमावाद दिवसागणिक पेटत चालला आहे. या वादाचा पुन्हा एकदा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर झाला आहे.

या वादामुळं कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा (Maharashtra Bus Service) सुरू झाली आहे. कर्नाटकची बस बेळगावहून पुण्याला रवाना होणार असल्याचं कळतंय.

दोन दिवसांपूर्वी बेळगाव शहर आणि परिसरात कन्नड संघटनांनी हैदोस घातला होता. त्यामुळं दोन्ही राज्यांमधील वातावरण बिघडण्याचा प्रयत्न सुरू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील हिरे बागेवाडीजवळ राज्यातील वाहनांना लक्ष्य करण्यात आलं होतं. यावेळी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्यामुळं हा वाद आणखी पेटला, यामुळं बससेवा बंद (Karnataka Bus Service) करण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा बससेवा सुरु करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *