Gold Price Today:आज सोन्याचा भाव पुन्हा वधारला, चांदी ६८ हजारांच्या वर ; चेक करा ताजे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ डिसेंबर । मंगळवार, १३ डिसेंबर रोजी भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. व्यवहाराच्या सुरुवातीला मौल्यवान धातूंचे दर हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. त्याचबरोबर आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव सुरुवातीच्या व्यवहारात ०.१० टक्क्यांच्या वाढीसह तर वायदा बाजारात आज चांदी कालच्या बंद किमतीच्या तुलनेत ०.५४ टक्क्यांनी वधारले आहे. गेल्या व्यापार सत्रात चांदीचा दर ०.३८ टक्क्यांनी घसरला होता. 

मंगळवारी, फ्युचर्स मार्केटमध्ये २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव कालच्या बंद किमतीपासून सकाळी ९.१० वाजेपर्यंत ५८ रुपयांनी वाढून ५४,१९० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर आज सोन्याचा भाव ५४,१३२ रुपयांवर उघडला. यानंतर पुन्हा एकदा एकदा किंमत ५४,१९७ रुपयांवर पोहोचली तर काही काळानंतर दर ५४,१९० रुपयांपर्यंत घसरले.

दुसरीकडे, आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) चांदी देखील हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे. कालच्या बंद भावावरून आज चांदीचा दर ३६६ रुपयांनी वाढून ६८,१५२ रुपये प्रति किलो झाला. तर चांदीचा दर आज ६८,०८५रुपयांवर उघडला आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात चांदीचा भाव २५८ रुपयांनी घसरून ६७,७८० रुपयांवर बंद झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *