महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ डिसेंबर । मनी लॉंडरिंगच्या केसमध्ये सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळं मलिक यांचा आणखी काही दिवस तुरुंगातला मुक्काम कायम राहणार आहे. (Money laundering case Bombay HC refuses to urgently hear bail plea of Nawab Malik)
आपल्या केसवर तातडीनं सुनावणी घेण्यात यावी अशी याचिका नवाब मलिक यांच्यावतीनं मुंबई हायकोर्टात करण्यात आली होती. पण हायकोर्टानं या तातडीच्या सुनावणीला नकार दिला. तसेच यावरील पुढील सुनावणी ६ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली. तसेच दोन आठवड्यांत मलिक यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश हायकोर्टाने ईडीला दिले.