महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ डिसेंबर । सोने चांदीच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सोन्याच्या दरात साडेसातशे रूपयांची तर चांदीच्या (Gold And Silver) दरात पंधराशे रूपयांची वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांचा विचार केल्यास सोन्याच्या दरात (Gold Price Today) बाराशे रूपयांची तर चांदीच्या दरात चार हजारांची वाढ (विना जीएसटी) झाली आहे.
अमेरिकेच्या मुख्य बँक फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा एकदा व्याज दरवाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वर्षाच्या अखेरीस फेडरल रिझर्व्हकडून शेवटची दरवाढ केली जाईल, असा अंदाज आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. याचा परिणाम जागतिक बाजारपेठत सोने दरवाढीवर होत आहे. लग्न सराई, सोन्याला वाढती मागणी यामुळे सोन्याचे दर वाढताहेत.
जळगावचे (Jalgaon) सोने शूध्द असल्याने त्याला देशभर मागणी आहे. दिवाळीनंतर सातत्याने सोने, चांदीच्या दरात वाढ होत आहे. एक डिसेंबरला सोन्याचे दर प्रती तोळा ५३ हजार (विना जीएसटी) होते. तर चांदी ६४ हजार (विना जीएसटी) होते.तर आजचे दर सोने ५४ हजार २०० तर चांदीचे दर ६८ हजारांवर पोचले आहे.