‘पोक्सो’मधून सोडविण्यासाठी 10,000 ची लाच स्विकारताना पोलीस शिपायास रंगेहाथ पकडले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ डिसेंबर । चाकण ( लक्ष्मण रोकडे ) । पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्हयामध्ये आरोपी असलेल्या चिमा वाघमारे यांना सदर गुन्हयामध्ये आरोपी न करण्यासाठी संतोष सुरेश पंदरकर, पोलीस शिपाई, पाईट दूरक्षेत्र, चाकण पोलीस स्टेशन यांना 10,000 रूपये रकमेची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिमा वाघमारे यांच्यावर चाकण पोलीस स्टेशन येथे पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयामध्ये त्यांना आरोपी न करण्यासाठी पोलीस शिपाई पंदरकर यांनी फिर्यादी रोहिदास वसंत कुडेकर यांच्याकडून 10,000 रक्कम लाचेची मागणी केली. त्याविरूद्ध त्यांनी ला. प्र. वि. पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली असता दिनांक 3/10/2022 रोजी त्याची पडताळणी केली. त्यामध्ये ते दोषी आढळले असल्याने दिनांक 19/12/2022 रोजी आरोपी पंदरकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

याबाबत ला.प्र.वि. पुणे चे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे यांच्याशी आमचे प्रतिनिधी यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये आरोपी पंदरकर यांच्यासह आणखी एक खासगी इसमही सामील होता. परंतु तो सध्या फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी पंदरकर यांना दिनांक 20/12/2022 रोजी कोर्टासमक्ष हजर केले असताना कोर्टाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *