महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ डिसेंबर । भारतात ५जी सेवा सुरू झाली आहे. देशातील प्रमुख टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेलने देशातील प्रमुख शहरांमध्ये ५जी नेटवर्क उपलब्ध केले आहे. Bharti Airtel देखील ५जी सर्व्हिसचा विस्तार करत आहे. आता कंपनीने पुणेकरांना नववर्षाचे गिफ्ट देत शहरात ५जी सेवा सुरू केली आहे.
Bharti Airtel ने भारतात ५जी सेवा सुरू केली असून, यूजर्सला एकही रुपया अतिरिक्त खर्च न करता हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळणार आहे. कंपनी लवकरच इतर शहरांमध्ये देखील सेवा सुरू करणार आहे. विशेष म्हणजे पुणेकरांना ५जी चा वापर करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. यूजर्स ४जी प्लॅन्समध्येच Airtel 5G Plus चा आनंद घेऊ शकतात.
Airtel 5G सेवा सध्या पुण्यातील कोरगाव पार्क, कल्याण नगर, बाणेर, हिंजेवाडी, मगरपट्टी, हडपसर, खराडी, मॉडेल कॉलनी, स्वारगेट, पिंपरी-चिंचवडसह इतर भागात सुरू झाली आहे. कंपनी शहरातील इतर भागात देखील लवकरच सेवा सुरू करणार आहे. यामुळे आता यूजर्सला हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळेल. यूजर्सला ४जी च्या तुलनेत २० ते ३० पट अधिक हाय-स्पीड इंटरनेटचा फायदा मिळेल.
यूजर्सला हाय क्वालिटी व्हीडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग, मल्टीपल चॅटिंग आणि इंस्टंट अपलोडिंगचा फायदा मिळेल. कंपनीनुसार, Airtel 5G Plus मुळे शिक्षण, आरोग्य, कृषि क्षेत्रातही मोठा बदल पाहायला मिळेल. दरम्यान, लक्षात घ्या की ५जी नेटवर्कसाठी तुम्हाला एअरटेल सिम अपग्रेड करण्याची गरज नाही. तुमच्या फोनमध्ये ५जी सपोर्ट आणि व्हॅलिड ४जी प्लॅन असणे गरजेचे आहे.