सासऱ्यासोबत दारु पार्टी केली, मग सासूला घेऊन पळाला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ जानेवारी । जयपूर: राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात सासू आणि जावयाची अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. येथे एक ४० वर्षांची सासू तिच्याच २७ वर्षांत्या जावयाच्या प्रेमात पडली. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा हे दोघेही घरातून पळून गेले. पळून जाण्यापूर्वी जावयाने सासऱ्यासोबत पार्टी केली होती. जेव्हा सासरा दारुच्या नशेत होता तेव्हा सासू आणि जावयाने पळ काढला. शुद्धीवर आल्यावर जेव्हा सासऱ्याला हा कारनामा कळाला तेव्हा तो पुन्हा भोवळ येऊन कोसळला. अखेर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. आता पोलीस या प्रेयसी सासू आणि प्रयकर जावयाचा शोध घेत आहेत.

सिरोही जिल्ह्यातील रेवदार उपविभागातील अनादरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. इथल्या सियाकरा गावात एक सासू आपल्या जावयाच्या प्रेमात पडली. त्यानंतर हे अनोखे प्रेमी युगल संधी मिळताच घरातून पळून गेले. हा प्रकार सासरच्या मंडळींना समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली. सासरे रमेश यांनी रविवारी अनादरा पोलीस ठाण्यात त्यांचा जावई नारायण जोगी याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

रमेश यांनी त्यांच्या तक्रारीत सांगितले की, त्यांची मुलगी किसनाचा विवाह मामावली येथील रहिवासी नारायण जोगी याच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांची मुलगी आणि जावई घरी ये-जा करत असत. शुक्रवारी ३० डिसेंबर रोजी जावई सासरी आला होता. त्यादरम्यान, त्यांनी जावई नारायणसोबत दारु पार्टी केली. त्यानंतर ते दारुच्या नशेत असतानाच झोपून गेले. याचाच फायदा घेत जावई सासूसह पळून गेला.

जाग आली तेव्हा दोघं पळून गेल्याचं समजलं

त्यानंतर सायंकाळी ४ वाजता रमेश यांना जाग आली. तेव्हा त्यांना पत्नी आणि जावई नारायण घरातून बेपत्ता असल्याचं समजलं. रमेशने पत्नीचा इकडे-तिकडे शोध घेतला. मात्र ती सापडली नाही. त्यानंतर रमेशने चौकशी केली असता जावई नारायण याने पत्नीला समज देऊन पळवून नेल्याचे समोर आलं. रमेशची मुलगी मामावाली तिच्या सासरच्या घरी होती. त्यानंतर रमेश यांना संपूर्ण प्रकार कळला. यावर त्यांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली.

जावई एका मुलीलाही सोबत घेऊन गेला

अनादरा ठाणेप्रभारी बलभद्र सिंह यांनी सांगितले की, जावयाने सासूचे अपहरण केल्याची बातमी मिळाली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. जावयासह फरार झालेल्या सासूला तीन मुली आणि एक मुलगा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चारही मुलं विवाहित आहेत. प्रेमी जावयालाही तीन मुलं आहेत. त्याने आपल्या एका मुलीला सासूसोबत नेले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले असून दोघांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *