Mahavitaran Strike : संपकरी कर्मचाऱ्यांना अखेर मेस्मा लावला, आंदोलन चिघळणार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ जानेवारी । राज्यभरातील बत्ती आजपासून गुल होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) )खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Mahavitaran Strike Latest News : राज्यभरात अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. महावितरण कंपनीच्या (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. आता वीज कर्मचाऱ्यांना इशारा देऊनही आंदोलन मागे न घेतल्याने राज्य सरकारने मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू केला आहे. सरकारने हा कायदा लागू केल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सरकारच्या इशाऱ्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *