महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ जानेवारी । राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मंगळवारी मध्यरात्री अपघात झाला. ते परळीला परतत असताना त्यांच्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. या अपघातामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला. त्यांच्यावर सध्या मुंबईमधील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन धनंजय मुंडे यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येची चौकशी केली. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना रुग्णालयातून सुटी कधी मिळणार याबाबत आज संध्याकाळी डॉक्टर माहिती देणार आहेत, असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
लोकप्रतिनिधींना आवाहन
दरम्यान धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवांद साधला यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींना आवाहन केले आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर आहे. मुंडे यांना रुग्णालयातून सुटी कधी मिळणार? याबाबत आज संध्याकाळी डॉक्टर माहिती देणार आहेत. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये. मी अनेकदा सांगितलं की रात्रीचा प्रवास करू नका. रात्रीच्या प्रवासात नेहमी अपघात होत आहेत. या आधी विनायक मेटे यांच्या कारचा अपघात झाला. त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाला आणि आता धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी रात्रीचा प्रवास टाळावा असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
काल धनंजय मुंडे यांच्या वाहनाचा अपघात झाला होता. अपघातानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचं कोणतंही कारण नसून, या अपघातात त्यांच्या छातीला थोडा मार लागला आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी कधी मिळणार याबाबत आज संध्याकाळी डॉक्टर माहिती देणार आहेत.