Pune Breaking : पुण्यात MNGL पाईपलाईन लिक झाल्याने भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ जानेवारी । पुण्यात मध्यरात्री राजाराम पुराजवळ भीषण आगीची घटना समोर आली आहे. MNGL पाइपलाइनचं काम सुरू असताना अचानक स्फोट झाला आणि या स्फोटातून आगीचे मोठे लोळ बाहेर आले. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावर राजाराम फुलाजवळ ही आग लागली असून अग्निशमन दलाची तीन वाहनं आग क्षमवण्याचे काम करीत आहेत. तर एमएनजीएलचे कर्मचारीदेखील घटनास्थळी दाखल आहेत. या आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे इथून वाहतूक वळवण्यात आली असून मुख्य पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दरम्यान, यामध्ये अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही. खोदकाम सुरू असल्यामुळे गॅसची लाइन लीक झाली आणि हा स्फोट झाला. यामुळे उद्या पुण्याच्या दक्षिण भागांमध्ये पुरवठा बंद राहणार आहे. वस्ती नसलेल्या भागांमध्ये हे झालं म्हणून ठीक नाहीतर गंभीर झालं असतं असंही बोललं जात आहे. जोपर्यंत पाईपलाईनमध्ये गॅस शिल्लक आहे तोवर आग सुरू राहणार असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. तर आतापर्यंत तीन टँकरचा वापर करण्यात आलाय पण तरीही आग अद्यापही धुमसत असल्याची माहिती फायरमॅन राजेश जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *