Debit Card : या बँकेच्या ग्राहकांना दणका ; बँकेनं वाढवले डेबिट कार्डवरील शुल्क

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ जानेवारी । नव्या वर्षात वाढत्या व्याजदरासोबत बँकेनं ग्राहकांना आणखी एक दणका दिला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने नव्या वर्षात ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने सर्व प्रकारच्या डेबिट कार्डवरील सेवा शुल्कात वाढवलं आहे. बँकेच्या सूचनेनुसार, नवीन सेवा शुल्क 13 फेब्रुवारी 2023 पासून लागू होणार आहे.

कॅनरा बँकेने निवेदनात म्हटलं की, बँकेने वार्षिक शुल्क, कार्ड रिप्लेसमेंट, डेबिट कार्ड इनअॅक्टिव्हिटी चार्ज आणि एसएमएस अलर्ट चार्जेसवरील सेवा शुल्कात वाढ केली आहे. सर्व्हिस चार्जमध्ये कराचा समावेश करण्यात आला नाही. लागू होणारे कर वेगळे घेतले जातील. नवे दर 13 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.

किती वाढले शुल्क?
नव्या बदलानुसार बँकेनं वार्षिक शुल्कातही वाढ केली आहे. क्लासिक किंवा स्टँडर्ड डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क 125 वरुन 200 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे. प्लॅटिनम कार्डचे शुल्क 250 रुपयांवरून 500 रुपये आणि बिझनेस कार्डचे वार्षिक शुल्क 300 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आले आहे. निवडक डेबिट कार्डसाठी बँक 1000 रुपये वार्षिक शुल्क आकारणार आहे.

डेबिट कार्ड बदलण्यासाठी लागणार चार्ज?
बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार स्टँडर्ड कॅटेगरी डेबिट कार्डला बदलायचं असेल तर तुम्हाला 150 रुपये द्यावे लागणार आहेत. याआधी त्यासाठी कोणतेही शुल्क लावले जात नव्हते. प्लॅटिनम, बिझनेस आणि सिलेक्टेड कॅटेगरी डेबिट कार्ड बदलण्यासाठी 50 ते 150 रुपये असे वेगवेगळे चार्ज

कार्ड इनअॅक्टिव्ह आणि मेसेज अलर्ट फी
डेबिट कार्ड बंद करण्यासाठी देखील आता चार्ज लागणार आहेत. 300 रुपयांपर्यंत हे चार्ज असणार आहेत. याशिवाय वेगवेगळ्या श्रेणीसाठी वेगळे शुल्क असेल. SMS अलर्टसाठी 15 रुपयांची फी होती आता ती वाढवण्यात आली आहे.

महाग झालं लोन
RBI ने रेपो रेट वाढवल्यानंतर इतर बँकांनी आपल्या MCLR मध्ये वाढ केली आहे. त्यामुळे EMI आणि कर्ज दोन्ही महाग झाले आहेत. कॅनरा बँकेनं 15 ते 25 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. त्यामुळे लोन आणि EMI देखील वाढला आहे.

rashibhavishy
rashibhavishy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *