पोटात गॅस वाढवतात ‘या’ भाज्या ; ‘हे’ उपाय केल्यास मिळू शकतो आराम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ जानेवारी । पोटात गॅस होणे ही जगभरात सर्वांनाच होणारी एक सामान्य समस्या आहे. पण या गॅसमुळे अनेकदा चारचौघात मान खाली घालायची वेळ येऊ शकते. आहारतज्ज्ञांच्या मते आपल्या पोटात ज्या वेळी प्रमाणाच्या बाहेर अन्नपदार्थ ढकलले जातात तेव्हा अगोदरच असणारा पाचक रस आणि वायूमुळे पोट गच्चपणा वाटू लागते. पोटात गॅस तयार होणे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण तो दीर्घ काळ राहिल्यास गच्चपणा व पोट फुगण्याचा त्रास होतो. सतत ढेकर येत राहतात. वात सुटत राहतो. पोटातून आवाज येत राहतात.आपल्याला हा त्रास टाळायचा असल्यास सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचं आहारावर नियंत्रण ठेवणे. आज आपण असे कोणते पदार्थ व भाज्या आहेत ज्यामुळे पोटात गॅस वाढतो हे जाणून घेणार आहोत. 

पोटात गॅस वाढवणाऱ्या भाज्या व पदार्थ
वांगी
काकडी
कोबी
फ्लॉवर
सोयाबीन
यीस्ट/ ग्लूटेन
दूध
सफरचंद
काबुली चणे, राजमा सारख्या अख्ख्या डाळी
हिरवे वाटाणे
मुळा
सुकामेवा
च्युईंग गम

हेल्थलाइन च्या माहितीनुसार बहुतांश लोक दिवसातून किमान १४ वेळा गॅस पास करतात. आहारतज्ञ  यांच्या मते, काही पदार्थ शरीरातील गॅस कमी करण्यास मदत करतात. यापैकी हे काही सोपे उपाय आपणही करून पाहू शकता..

पुदिना चहा: एका ग्लास पाण्यात काही पुदिन्याची पाने उकळा यात वाटल्यास लिंबाचा रस टाकून घेऊन शकता.

हर्बल टी: जिरे आणि बडीशेप (१० ग्रॅम) उकळत्या पाण्यात २० मिनिटे भिजवून हे पाणी प्यावे.

दही: दह्यातील प्रोबायोटिक्स पचन सुधारण्यास आणि पोटातील अतिरिक्त वायू काढून टाकण्यास मदत करतात.

धणे: धण्याचे दाणे एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा हे पाणी व गाळून पिऊ शकता किंवा ते दाणे चघळूनही आराम मिळू शकतो.

पोटातील गॅसची समस्या टाळण्यासाठी आहारतज्ज्ञ सांगतात की, जेवताना, खात असताना खूप बोलू नये आणि आणि घाईगडबडीत घास गिळू नयेत. त्यामुळे अन्नासह हवाही पोटात जास्त प्रमाणात जाऊन हा त्रास होतो. अन्नसेवन करताना ताठ बसून खावे. तोंड बंद करून घास चघळावेत.

टीप ; येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे, कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *