Mharashtra Cold Wave : राज्यात थंडीची लाट ओसरली ; पुण्यासह मराठवाडा ; विदर्भात गारठा कायम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ जानेवारी । राज्यात जानेवारीच्या सुरूवातीपासून राज्यात थंडी वाढायला सुरू झाली आहे. दरम्यान उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली असतानाच, महाराष्ट्रात किमान तापमानात काही प्रमानात वाढ झाली आहे. परंतु उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कायम आहे. आज (ता.17) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता आहे.

 

देशाच्या उत्तरेत आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर जोरदार होत आहे. वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तर भागात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आहे. काल (ता. 16) धुळे येथील कृषी महाविद्यालय व निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी 6.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जळगाव, औरंगाबाद येथेही तापमानाचा पारा 10 अंशांपेक्षा खाली असून उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमानातही वाढ-घट सुरूच असून, तापमानाचा पारा 26 ते 34 अंशांच्या आसपास आहे. सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 33.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

दरम्यान राज्यात मागच्या 24 तासांमध्ये पुणे 31.4 (10.8), जळगाव 27.0 (10), धुळे 26 (6.5), कोल्हापूर 31.3 (16.9), महाबळेश्वर 26.8(13), नाशिक 29.5 (10.5), निफाड 30.5 (6.5), सांगली 31.1 (15.1), सातारा 31.9(12.7), सोलापूर 33.7 (15.5), रत्नागिरी 29 (16), औरंगाबाद 29.8 (10), परभणी 30.5(15), अकोला 30.6 (15.2), अमरावती 29.8 (13), बुलडाणा 28 (13.8), ब्रह्मपुरी 30.2 (14.5), चंद्रपूर 28.6 (16.2), गडचिरोली 30.4(14.4), गोंदिया 27(11.5), नागपूर 28.1 (13.8), वर्धा 29.4(14.4), तापमानाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *