महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।२२ जानेवारी । गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत दोन्हीही पक्षाकडून कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना व आमची युतीबाबत बोलणी झालेली आहेत. उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करावी अशी आमची भूमिका आहे. मात्र आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या चर्चा करत आहे. सर्वंनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे यांना वाटत असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं प्रकाश आंबेडकर यांनी?
शिवसेना व आमची युतीबाबत बोलणी झालेली आहेत. उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा करावी अशी आमची भूमिका आहे. मात्र आमच्या युतीबाबत ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सध्या चर्चा करत आहे. सर्वंनी एकत्र मिळून युतीची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेलं होतं. परंतु आम्ही त्यांना नाकारलेलं नाही, आम्ही केवळ दलितांपुरत मर्यादित राहावं अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका आहे, ती आम्हाला मान्य नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला विरोध नाही
अमरावतीमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबतची वंचित बहुजन आघाडीची भूमिका रोखठोकपणे मांडली आहे. त्यांनी एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याची तयारी दर्शवली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीला युतीची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करावी असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आल्यास आम्ही विरोध करणार नसल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे.