महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ जानेवारी । मोबाईलप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता 108 मेगापिक्सल कॅमेरा असणारा एक स्मार्टफोन लॉंच होणार आहे. हा स्मार्टफोन Oppo कंपनीचा असणार आहे कारण Oppo कंपनी लवकरच Oppo Reno 8T सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी चीनमध्ये ही सिरीज लाँच करण्यात आली होती आता लवकरच भारतात ही सिरीज लाँच होणार. फेब्रुवारीमध्येही ही सिरीज भारतात येऊ शकते. या सिरीजमध्ये Oppo Reno 8T 4Gआणि Oppo Reno 8T 5G यांचा समावेळ आहे. आज आपण या स्मार्टफोन्सची किंमत आणि फीचर्स जाणून घेणार आहोत. (Oppo Reno 8T series Oppo smart phone launch soon in india)
Oppo Reno 8T चे फीचर्स
108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा
कॅमेराला मायक्रोलेन्स सेन्सर
3 डी डिझाईन
67 वॅटचे फास्ट चार्जिंग
6.67 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले
8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज
मिडनाईट ब्लॅक, सनसेट ऑरेंज रंगाचे असू शकतात.
हेही वाचा: Best Stock : 14 वर्षांत गुंतवणूकदार कोट्यधीश… आता याच शेअरची डिलिस्ट होण्याची तयारी…
इतक्या रुपयांमध्ये असेल Oppo Reno 8Tची किंमत ?
Oppo Reno 8T सिरीजची किंमत 27,000 ते 29,000 रुपयांच्या दरम्यान असल्याची शक्यता आहे. Oppo Reno 8T या सिरीजमध्ये अगदी कमी किमतीत चांगले फिचर्स मिळणार आहे.