समताच्या हर घर क्यु.आर.कोड योजनेमुळे महिलांना घरात बसून बचत करता येणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – प्रतिनिधी – अजय विघे-

कोपरगाव : समता पतसंस्था प्रत्येक वयोगटातील सभासदांसाठी अनेक नवनवीन योजना आणि उपक्रम राबविणारी पतसंस्था म्हणून महाराष्ट्रात अग्रेसर आहे.नवनवीन योजना आणि उपक्रमामुळे समताच्या सभासदांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. घरपोहच योजनांबरोबर मोबाईल बँकिंगद्वारासुद्धा अनेक योजना सभासदांना देत आहेत.आज हर घर क्यू.आर.कोड योजनेचा शुभारंभ करून विशेष करून महिलांना पैशांची बचत आणि सुरक्षित करण्याचा एक मार्ग खुला करून दिला आहे.असे प्रतिपादन डॉ.वैशाली फुलसुंदर यांनी केले.

समता पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ. श्वेता अजमेरे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव शहरातील निवारा परिसरात हर घर क्यू.आर.कोड योजनेचा शुभारंभ डॉ.वैशाली फुलसुंदर, सौ.दिपा गिरमे, सौ जिजाबाई कापे, सौ.अनिता सरोदे यांच्या शुभहस्ते आणि सौ.शोभा दरक, सौ.जोत्सना पटेल, सौ.चित्रा शिरोडे, सौ.मंगल लोणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.श्वेता अजमेरे यांचा सत्कार निवारा परिसरातील सौ.सुनिता मुदबखे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.वैशाली फुलसुंदर यांचा सत्कार सौ.श्वेता अजमेरे, सौ.दिपा गिरमे यांचा सत्कार सौ.जोत्सना पटेल, सौ.जिजाबाई कापे यांचा सत्कार सौ.चित्रा शिरोडे तर सौ.अनिता सरोदे यांचा सत्कार सौ.सुनंदा भट्टड, सौ.मंगल लोणगावकर यांचा सत्कार सौ. जोत्सना पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच निवारा परिसरातील महादेव मंदिर व हनुमान मंदिरासमोरील जागेत शेड साठी देणगी दिल्याबद्दल श्रीकांतलाल जोशी यांचाही सत्कार समता पतसंस्थेचे संचालक श्री चांगदेव शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून योजनेचे वैशिष्ट्य सांगताना श्रीमती उज्वला बोरावके म्हणाल्या की, प्रत्येक घरातील पतीने पत्नीला घर खर्चासाठी रोख रक्कम दिल्यास ती रक्कम पत्नीकडून पर्स, डबे, देवघरात ठेवली जाते. ती रक्कम हरवणे किंवा चोरीला जाण्याची शक्यता असते. पण समताच्या क्यू.आर.कोडच्या माध्यमातून रोख रक्कम दिल्यास ती रक्कम सुरक्षित राहू शकते आणि त्या रकमेला ७ टक्के व्याजदरही दिला जातो आणि घरात बसून बचत ही करता येऊ शकते.

योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर डॉ. वैशाली फुलसुंदर, सौ.सुनंदा व श्री.लक्ष्मीनारायण भट्टड, श्रीमती आशा पवार, श्री.किशोर कुलकर्णी आदींसह परिसरातील सभासदांना समता पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रत्येक सभासदाच्या घरात क्यू. आर कोड देण्यात आले. निवारा परिसरातील सौ.मीना व्यास, सौ. सुनंदा भट्टड, सौ.सुनिता मुदबखे, सौ.मंगलाताई बुचके, श्रीमती छाया ओस्तवाल, श्री.अजय तांबे आदींनी मनोगतातून समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे आणि अधिकाऱ्यांचे आभार मानत आमच्यासाठी अनेक योजना आणि उपक्रम आणत असतात त्यात आम्हा सभासदांचे हितच असून आम्हाला आर्थिक स्थिरता प्राप्त करून देत आहे.

कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी, गुलशन होडे, बाळासाहेब कापे, हर्षल जोशी आदींसह परिसरातील संस्थेचे सभासद, हितचिंतक , संस्थेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी केले.उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर श्री सचिन भट्टड यांनी मानले.

………………………………………..

कोट – समता पतसंस्थेच्या माध्यमातून भारतात पहिल्यांदा मंदिरात दानपेटीची सुविधा देऊन मंदिरातील पैशांना सुरक्षितता प्राप्त करून दिली आहे. त्याच प्रमाणे समताने अजून एक विक्रम केला असून महिलांसाठी भारतातील संस्थेच्या प्रत्येक सभासदाच्या घरात हर घर क्यू.आर.कोड योजनेच्या माध्यमातून क्यू.आर. कोड देण्याचा शुभारंभ करण्यात आला असून त्या क्यू.आर. कोडच्या माध्यमातून बचत खात्यावर जमा होणाऱ्या रकमेवर ७ टक्के व्याज देखील समता त्या सभासदाला देणार आहे.तसेच कोपरगाव नगरपालिकेने सहकार्य केल्यास घरपट्टी व पाणीपट्टी देखील समताच्या क्यू.आर.कोड च्या माध्यमातून थेट नगरपालिकेच्या खात्यात जमा करता येऊ शकते. असा माझा मानस आहे.
काका कोयटे, चेअरमन
समता पतसंस्था.

फोटो ओळ – समता पतसंस्थेच्या हर घर क्यू आर कोड योजननेचा शुभारंभ प्रमुख पाहुणे डॉ.वैशाली फुलसुंदर, सौ. श्वेता अजमेरे, सौ.दिपा गिरमे, सौ जिजाबाई कापे, सौ.अनिता सरोदे, सौ.शोभा दरक, सौ.जोत्सना पटेल, सौ.चित्रा शिरोडे, सौ.मंगल लोणगावकर, सौ.सुनंदा भट्टड यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *