Republic Day : महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात दूसरा क्रमांक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० जानेवारी । 26 जानेवारी रोजी देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने दिल्लीतील लाल किल्ल्यावरील कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांकडून शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन करण्यात आले. त्याचबरोबर देशातील विविध राज्याच्या चित्ररथाचे प्रदर्शनही करण्यात आले होते.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र ‘नारीशक्तीचा जागर’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या चित्ररथाचा देशात दूसरा क्रमांक आला आहे. तर उत्तराखंड राज्याच्या चित्ररथाचा पहिला क्रमांक आला आहे.

यावर्षी राज्यातील साडेतीन शक्तिपीठे तसेच स्त्री शक्तीचा जागर महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसून आले. त्याचबरोबर राज्यातील संस्कृती, पोतराज, वारकरी यांचाही प्रामुख्याने समावेश करण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा या नारीशक्तीचे दर्शन संबंध देशवासियांना घरबसल्या पाहायला मिळाला.

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरच्या परेडमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची बाजी मारली आहे. एकूण 17 राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे. यामध्ये साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान हा देखावा सादर करण्यात आला होता. चित्ररथांमधील दूसरा क्रमांक महाराष्ट्राला मिळाला आहे तर पहिला क्रमांक उत्तराखंडला, तर तिसरा युपीला मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *