Mumbai Wholesale Market : ट्रेंडिंग आणि स्टायलिश शूज स्वस्तात मिळणारे मुंबईचे मार्केट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ फेब्रुवारी । ऑफिसला जाताना, ट्रेकसाठी, लग्नसमारंभात, थंडीपासून बचाव करण्यासाठी, खेळताना वापरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बुट आपल्याला लागतात. हे बुट ट्रेंडिंग आणि स्टायलिश असावे असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर याची खरेदी करताना बजेटचीही काळजी घ्यावी लागते. तुम्हाला ट्रेंडिंग आणि स्टायलिश बुट हवे असतील तर मुंबईतील एका खास जागेची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कुठं आहे मार्केट?

मध्य मुंबईतील कुर्ला स्टेशनच्याबरोबर समोर बुट आणि चप्पलचे होलसेल मार्केट आहे. या ठिकाणी तुम्ही स्वस्त दरात शूजची खरेदी करू शकता. या मार्केटमध्ये इतर रिटेल मार्केटपेक्षा 30 ते 40 टक्के कमी किंमतीमध्ये शूज मिळतात. कुर्ला भागात असणाऱ्या या मार्केटच्या नावानेच हा परिसर ओळखला जातो. मुंबईच्या सर्व भागातून ग्राहक इथं खरेदी करण्यासाठी येतात. त्याचबरोबर हे मार्केट परदेशी पर्यटकांसाठी देखील मुख्य शॉपिंग स्पॉट बनलं आहे.

या बाजारात 30 – 40 दुकानं आहेत. इथं तुम्हाला प्रत्येक ब्रँडचे बुट मिळतात. त्याचबरोबर लग्नासाठी लागणारे डिझायनर शुज, कोल्हापुरी, मोजडी देखील मिळते. मोठ्या दुकानांमध्ये महाग असणारे बुट इथं स्वस्तात मिळत असल्यानं इथं ग्राहकांची नेहमी गर्दी असते. साधारण 200 रुपयांपासून ते 1 लाखापर्यंतचे शूज इथं मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *