Gold-Silver Price on 3 February 2023: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजचे भाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ फेब्रुवारी । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५३,६१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५२,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ७४,७०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,७०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,६१० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,४८० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५३,६१० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५८,४८० प्रति १० ग्रॅम आहे. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,६१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,४८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५३,६४० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५८,५१० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ७४७ रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *