Pune By Election: कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत, भाजपचं ठरलं ; आज जाहीर होणार उमेदवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ फेब्रुवारी । आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होवून अनेक दिवस उलटले मात्र अजून पर्यंत कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही.

मात्र पुण्यात आज भाजप- शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतली आणि या पोटनिवडणुकांसाठी आज संध्याकाळपर्यंत उमेदवार जाहीर होतील असं अश्वासन त्यांनी दिलं.

चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, येत्या ६ तारखेला उमेदवार अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे, त्यावेळी आम्ही अर्ज दाखल करू, अजून पर्यंत कोणाचे ही नाव निश्चित झालेले नाही. मात्र आज रात्री उशिरा नावे जाहिर होतील.

इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी तयार होत आहे. या दोन्ही जागांसाठी ६ तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ ठरवली आहे. कसबा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज सकाळी ११ वाजता आणि चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज १ वाजता भरला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *