Kasba Assembly By-Election : कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर ? ‘या’ नावांची आता चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ फेब्रुवारी । कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीतून (Kasba Peth Assembly By-Election) टिळक कुटुंब शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे. भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांना प्रदेश प्रवक्ते नियुक्त केले. या जागेसाठी मंगळवारपर्यंत अर्ज करायचे आहेत. (Political News in Marathi) दरम्यान, विद्यमान आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्यानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. (Maharashtra News in Marathi)

भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा
सुरुवातीला मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देऊन निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होती. पण शहर भाजपने प्रदेश भाजपकडे पाच नावं पाठवली आहेत. त्यात टिळक पितापुत्रांसह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते धीरज घाटे, गणेश बीडकर यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत उमेदवाराची घोषणा अपेक्षित असतानाच भाजपने कुणाल टिळक यांची प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची खेळी खेळली. त्यामुळे टिळक कुटुंबीयांची कसब्याच्या उमेदवारीवरील दावेदारी संपुष्टात आल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *