Gas Price : घरगुती गॅस सिलिंडर कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी संसदेत दिली माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० फेब्रुवारी । गॅस सिलिंडरच्या सततच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. यामुळे गॅस सिलिंडर स्वस्त किंवा त्याच्या किमती कमी कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अशा परिस्थितीत सिलिंडरच्या किमती कमी झाल्या तर सामन्यांना दिलासा मिळाणार आहे. आशातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीबाबत मोठी पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मोठं विधान केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर कमी झाल्यास एलपीजी सिलिंडरच्या दरही कमी होऊ शकतात, असं हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर ७५० डॉलर प्रति मेट्रीक टन इतके आहे. हे दर कमी झाल्यास घरगुती गॅस सिलिंडर कमी दरात उपलब्ध करुन दिले जाईल, असं पेट्रोलियम मंत्री पुरी म्हणाले. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीसह अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी पुरी यांनी माहिती दिली. आंतरराष्ट्रीय दर हे वेगवेगळ्या कराणांनी निश्चित केले जातात, असं त्यांनी सांगितलं.

सौदी अरेबियात गॅसच्या दरात ३३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पण त्या तुलनेत केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात अतिशय कमी वाढ केली आहे, असं पुरी म्हणाले. सौदी अरेबियात गॅसचे दर कमी झाल्यास भारतातही सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात. मुंबईत सध्या १४.४ किलो गॅस सिलिंडरचा दर हा १०५२.५० रुपये इतका आहे. पुण्यात १०५६ रुपये, ठाण्यात १०५२.५० रुपये आणि नागपुरात ११०४.५० रुपये इतकी किंमत आहे.

सुरुवातीला प्रत्येक गॅस कनेक्शन धारकाला अनुदान दिलं जात होतं. पण आता गॅस सिलिंडरवरील अनुदान पूर्णपणे बंद केलं आहे. पण गॅस सिलिंडरवरील अनुदान सुरू झाल्यास ते कोणाला मिळणार? असा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्व प्रथम गरीबांना अनुदान दिले जाईल. करोनाच्या काळात लॉकडाउनमुळे गरीबांची मोठी कोंडी झाली होती. या काळात सरकारने गरीबांना मोफत तीन गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिली होती, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *