महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० फेब्रुवारी । युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी आपल्या ब्रिटन दौर्यात लढाऊ विमाने देण्याची विनंती केल्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रशियाचा तिळपापड झाला आहे. ब्रिटनने युक्रेनला लढाऊ विमाने पुरवल्यास रक्ताचे पाट वाहतील, अशी धमकीच रशियाने ब्रिटनला दिली आहे.
झेलेन्स्की यांच्या ब्रिटन दौर्यावर बारकाईने नजर ठेवून असलेल्या रशियाने म्हटले आहे की, ब्रिटिशांनी मैत्रीपूर्ण संबंधांना हरताळ फासल्यास, रशिया सडेतोड उत्तर देण्यास सक्षम आहे. युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवणे म्हणजे युद्धाचा भडका उडवणेच ठरणार आहे. परिस्थिती चिघळल्यास त्याला रशिया जबाबदार नसेल. ब्रिटनने युक्रेनला लढाऊ विमाने पुरवल्यास रक्ताचे पाट निश्चित वाहतील, अशी थेट धमकीही रशियाने दिली आहे. झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात लढण्यासाठी अमेरिकेसह सर्वच देशांकडे मदत मागितली आहे.