महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ फेब्रुवारी । अजय विघे|कोपरगाव- कोपरगाव चे निर्माते व दिग्दर्शक भारत मोरे यांचा नवीन मराठी चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीमध्ये एक चर्चे झाली आहे, या मराठी चित्रपटासाठी मोरे यांनी एक हटके विषय घेतला असून तोप्रेक्षकांना कौतुहल निर्माण करणार आहे, या चित्रपटाने वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केले आहे, आणि तो चित्रपट आता येत्या २४ फ ब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज साठी सज्ज झाला आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित देवळे यांनी केले आहे
कामाशी ईमानदारी आणि सातत्य हे सत्त्याच्या मार्गाने कितीही खडतर प्रवास असला तरी यश नक्कीच मिळते याची अनुभूती देणारी विश्वासाने आज मनःपुर्वक जाणीव होत आहे..
चित्रपटाचं लिखाण स्म शानभूमीची राखेतून भरारी घेत देहदानाच्या संकल्पनेतून साकारलेल्या भूमिकांमध्ये जीव ओतून काम करणाऱ्या कलावंतांना माझा आज पुन्हा एकदा मानाचा मुजरा. कथेचा विषय समस्त जगभरातील मानवजातीला म ार्गदर्शन करताना देहदान नेत्रदान करण्याची प्रेरणादायी शक्ती देत असेल तर मी एक साधारण अनुभवी लेखक म्हणून मला आज अभिमान वाटतो आहे. सोबतचे निर्माता मनेष लोढा, मसुटाचे अवजड जहाज हाकणारे अजित देवळे आणि जहाजाचे इंधन म्हणून आम्ही निर्माते होतोच पण संपुर्ण टिम शिवाय मसुटाचे जहाज जगभरात पोहचू शकले नसते त्या मेहनत घेणाऱ्या टिमलाही आज पुन्हा म नाचा त्रिवार मुजरा.
स्वप्न पाहावे पण स्वताहाची ताकद ओळखून बघावे असं म्हणतात ना. पण प्रयत्न केले तर वाळवंटातही बोर मारून नितळ प्यायचं पाणी काढता येवू शकतं आज हे पायाला पडलेल्या रक्ताळलेल्या भेगांच्या सुर्य आगीने सहज वाटू लागले आहे, अनेकांची मदत नानाविध पध्दतीने मसुटाला झाली पण खरी ताकद मला माझ्या धर्मपत्नी सौ. सपनाने दिली, निमुटपणे सगळा होणारा त्रास तिनं सहन केला आणि खोल खड्ड्यांच्या अति अवघड प्रवासात पटलं नसेल तरी हा म्हणत साथ दिली म्हणून मी माझं स्वप्न कदाचित तिच्या स्वप्नांना तिलांजली देत आज पुर्णत्वास नेतो आहे म्हणून आज सौ. सपनालाही एकदा मानाचा मुजरा, लहान भाऊ संदीप त्यानेही अनेक संकटातल्या अंधारात उजेड देत मसुटाचा प्रवास सुरू ठेवला, मित्र कै. विजु.. आणि संतोष, सुनिल हे मसुटाच्या प्रवासात रस्ता दाखवण्याचे काम करत गेले. आता मसुटा प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता मंग भाचा पप्पूने जबाबदारी घेत काऊनडाउन सुरू केले आणि २४ तारखेला अखेर अनपेक्षित स्वप्न पिक्चर टॉकीजला माझा मसुदा पहीला सिनेमा प्रदर्शित होणार आहे याचा अभिमान मला अभिमान या सर्वांच्या सहकार्याने आज वाटत आहे… अशाच मानवहिताच्या कथा मनोरंजक कथानकातून मी भविष्यात साकारण्यासाठी माय बाप रसिक प्रेक्षकांनी महाराष्ट्र भर प्रदर्शित होणाऱ्या जवळच्या चित्रपटगृहात जावूनच मसुटा चित्रपट पहावा ही अपेक्षा व प्रेक्षकांना आवाहन केले आहे.