चिंचवड विधानसभा बंडखोर उमेदवार राहुल कलाटें विरोधात बॅनरबाजी ; एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ फेब्रुवारी । आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, बंडखोरी करत शिवसेनेचे नेते असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणूनअर्ज दखल केला. त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने चिंचवड रोटनिवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. आता एका शिवसैनिकाने राहुल कलाटे यांना विरोध दर्शवण्यासाठी चिंचवड येथील चाफेकर चौकात बॅनर लावण्यात आले आहे.

एका अपक्षची उमेदवारी खोक्यातून… नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दरी, एकदम ओक्के डोक्यातून… खरा शिवसैनिक या आशयाचा मजकूर लिहून. राहुल कलाटे यांना विरोध दर्शविला आहे. या बॅनरची सद्या चर्चा सुरू झाली आहे. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे न घेतल्याने शिवसेना त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे देखील शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख सचिन आहीर यांनी देखील सांगितले आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत शिवसैनिकांकडूनच कलाटे यांना विरोध होत असल्याचे पहायला मिळत आहे.

राहुल कलाटे हे दांडगा जनसंपर्क असलेले नेते मानले जातात. सुरुवातीला त्यांच्या उमेदवारीची चर्चा असताना ऐनवेळी महविकास आघाडीकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे कुठे तरी राहुल कलाटे हे दुखावल्याचे पहायला मिळत आहे. म्हणूनच त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ नेत्यांच्या विनंतीला देखील त्यांनी मान न दिल्याने त्यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून आता बॅनरबाजी सुरू करण्यात आली आहे. सध्या त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, या बॅनरबाजीमुळे शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून याबाबत महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पक्षाचे नेते किरीट सोमय्या हे प्रचार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *