Pathaan Box Office Collection: ‘पठाण’ ; ओलांडला 1000 कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमी टप्पा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ फेब्रुवारी । बॉलिवूडचा (Bollywood) किंग, असं म्हटलं की शाहरुख खानचंच नाव निर्विवादपणे घेतलं जातं. असं नेमकं का? या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा खुद्द अभिनेत्यानंच दिलं आहे. तेसुद्धा त्याच्याच शैलीत. 2019 नंतर शाहरुख Pathaan या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. जिथं अनेकांनीच आता शाहरुखनं आता माघार घ्यावी, आता तो HERO वाटत नाही… असं म्हणत त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाकडे इशारा केला त्यांच्यासाठी ही चपराक ठरली. कारण, प्रदर्शित झाल्या क्षणापासून किंग खानच्या या चित्रपटानं अविश्वसनीय कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे.

शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), डिम्पल कपाड़िया (Dimple Kapadia) आणि आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणआऱ्या या चित्रपटाची जादू प्रदर्शनानंतर सलग 27 व्या दिवशीही कायम आहे. आजही ज्यांना हा चित्रपट पाहिला नाही त्यापैकी काहीजण पश्चाताप करत आहेत तर काही चाहते थेट चित्रपटगृहांची वाट धरतना दिसत आहेत.

चित्रपटाच्या कमाईचा जगभर डंका
शाहरुखच्या या चित्रपटानं संपूर्ण जगभरात तब्बल 1000 कोटी रुपयंहूनही जास्तीची कमाई करत हा चित्रपट दुप्पट वेगानं पुढे निघाला आहे. इतर चित्रपटांचं आव्हान असतानाही Pathaan त्यामध्ये ब्लॉकबस्टर ठरला आहे. भारतामध्ये या चित्रपटानं तब्बल 500 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जागतिक स्तरावर याच्या दुप्पट आकडा पाहायला मिळत आहे.

जागतिक स्तरावर 1000 कोटी रुपये कमवणारा Pathaan पाचवा चित्रपट
बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइड (Box Office Worldwide) च्या माहितीनुसार शाहरुखच्या या चित्रपटानं भारतात 623 कोटी रुपये कमवले आहेत. तर, हा जागतिक स्तरावर 1000 कोटी रुपयांची कमाई ओलांडणारा पाचवा भारतीय चित्रपट ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *